सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड जिल्हा आरोग्य विभागाने आता कात टाकली आहे. आॅक्टोबर २०१८ मध्ये बीड जिल्हा मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात मराठवाड्यात अव्वल होता. आता याच बीड जिल्ह्याने उद्दिष्टापेक्षा दुप्पट म्हणजे १९७ टक्के काम करून महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. आरोग्य विभागाचे हे मोठे यश मानले जात आहे.प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, कुटूंबकल्याण शस्त्रक्रियेनंतर आता बीड जिल्ह्याने मोतीबिंदु शस्त्रक्रियेतही राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. आॅक्टोबर २०१८ पर्यंत सहा महिन्यात ३२५० शस्त्रक्रिया केल्या होत्या. यावेळी बीडने लातूर, उस्मानाबादला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला होता.कामाची हीच गती कायम ठेवत बीडच्या आरोग्य विभागाने आता राज्यातही अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सतिष हरिदास, डॉ.आय.व्ही.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व नेत्रविभाग कार्यरत आहे.दरम्यान, मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. ५०-५५ वर्षानंतर वयोमानानुसार होणारा हा आजार आहे. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रीत होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग (लेन्स) पूर्णत: पारदर्शक असणे आवश्यक असते. जेव्हा या लेन्सची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्याने कमी होते तेव्हा रुग्णास अंधूक दिसू लागते. मोतीबिंदू अर्थात लेन्सला आलेला गढूळपणा काळानुसार वाढतच जातो व रुग्णास अधिकाधिक अस्पष्ट दिसू लागते. नेत्रमणी हा बहुतांशी प्रथिने व न्यूक्लिक आम्ल या जैविक रसायनांपासून बनलेला असतो. यात काही कारणांनी बदल झाल्यास नेत्रमण्यांची पारदर्शकता कमी होत जाते. त्यामुळे दृष्टी कमी होते.
अगोदर मराठवाड्यात, आता महाराष्ट्रातही बीड जिल्हा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:02 AM
बीड जिल्हा आरोग्य विभागाने आता कात टाकली आहे. आॅक्टोबर २०१८ मध्ये बीड जिल्हा मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात मराठवाड्यात अव्वल होता. आता याच बीड जिल्ह्याने उद्दिष्टापेक्षा दुप्पट म्हणजे १९७ टक्के काम करून महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे.
ठळक मुद्देमोतीबिंदू शस्त्रक्रिया । उद्दिष्टापेक्षा दुपटीने केल्या यशस्वी शस्त्रक्रिया