जावेद शेख/
आष्टी तालुक्यातील हिवरा येथील युवक शेतकरी सागर लगड यांनी आपल्या अंभोरा शिवारातील खडकाळ जमिनीवर दीड एकर शेतीत शेवंती फुलांची लागवड करून सहा महिन्यात दीड एकरात दोन लाखांची कमाई केली आहे.
सागरने २० फेब्रुवारीला पेपर व्हाईट जातीची शेवंतीची ८ हजार रोपे आणून लागवड केली. उन्हाळ्यात बोअरवेलला थोडे पाणी होते. छोटा खड्डा खणून त्यात शेततलावाप्रमाणे पाणी साठवले. त्याला ठिबक केले. त्यासाठी ३० हजार खर्च आला.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी फुले तोडणीला आली. त्याला १४० ते १८० रुपये भाव मिळाला. गणेशोत्सव काळात ४० ते ८० रुपये किलोला भाव मिळाला.
चॉकलेटी रंगाची सेंट व्हाईट जातीची शेवंतीची काही रोपे होती. या फुलांना मागणी असल्याने त्याला चांगला भाव मिळाला. एकंदरीत आतापर्यंत दीड लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. दसरा, दिवाळीत आणखी ५० ते ८० हजारांची कमाई होईल, असा विश्वास सागरने व्यक्त केला.
180921\img-20210915-wa0263_9.jpg