पाटोदा : तालुक्यात महावितरणने वीजबिलांची वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले होते. मात्र पावसाळा तोंडावर आलेला असतानाही रामवाडी येथील गावातील विजेचे आर्थिंग वायर अद्यापही एका झाडाला बांधलेले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
कायमस्वरूपी दुष्काळी व अल्प सिंचन क्षेत्र असलेल्या पाटोदा तालुक्यात बहुतांशी शेतकरी पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिके घेतात खरीप, रब्बी यापैकी खरीप हाच मोठा हंगाम असतो. त्यामुळे वर्षभरात शेतकरी विजेचा वापर कमी प्रमाणात करतात यंदा महावितरण कंपनीने शेतकऱ्यांकडील विद्युत बिलाची वसुली करण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित केला होता. या थकीत वीजबिलांची रक्कम भरल्यानंतरच या शेतकऱ्यांचे कनेक्शन जोडण्यात आले.
रामवाडी या छोट्याशा खेड्यात नागरिकांची घरगुती वीजबिलाची थकबाकी भरून घेण्यासाठी गावातील वीज बंद केलेली असून, गावातील विजेचे आर्थिंग वायर एका लिंबाच्या झाडाला बांधून ठेवले आहे. ज्या ज्या नागरिकांनी वीज बिल भरले त्यांना ट्रान्सफॉर्मरमधून केबलद्वारे वीज दिली आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या गलथानपणामुळे येथील नागरिक मात्र भीतीच्या सावटाखाली राहत आहेत. एव्हढेच नव्हे तर येथील ट्रान्सफॉर्मरला दरवाजा नाही. वीजबिलांची वसुलीसाठी कनेक्शन बंद करणारे महावितरणचे कर्मचारी अन्य वेळी पैसे घेतल्याशिवाय शेतकऱ्यांची विजेची कोणतीही कामे करीत नाहीत या कारभाराकडे तालुक्यातील महावितरणच्या वरिष्ठांचेही दुर्लक्ष होत आहे.
गावातील विजेची आर्थिंग वायर दोन महिन्यांपासून लिंबाच्या झाडाला अडकवलेली आहे रामवाडी येथील ट्रान्सफॉर्मर उघडेच आहे.
===Photopath===
250521\20210518_143543_14.jpg~250521\20210518_143606_14.jpg