कोरोनाबाधितांची वाढती संख्या सध्या चिंतेचा विषय बनत आहे. प्रशासन आणि शासनाची धावपळ होत आहे. अशातच आता लोकप्रतिनिधीही फिल्डवर उतरताना दिसत आहेत. रुग्णालय, कोविड केअर सेंटरमधील समस्या आणि तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळेच अगोदर खा.डॉ. मुंडे यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन कोरोना वाॅर्डाचा राऊंड घेतला. त्यानंतर शनिवारी दुपारी आ. संदीप क्षीरसागरही जिल्हा रुग्णालयात आले आणि कोरोना वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांशी संवाद साधला. रुग्णालयातील अस्वच्छता, सुविधांबाबत आढावा घेऊन सूचना केल्या. त्यानंतर परिचारिकांच्या समस्या जाणून घेत वाढीव खाटांच्या इमारतीची पाहणी केली. नंतर शहरातील आयटीआय, यशवंतराव चव्हाण आदी ठिकाणच्या कोविड केअर सेंटरलाही भेटी दिल्या. जिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत आ. क्षीरसागर रविवारी सकाळी ११ वाजता जिल्हा रुग्णालयात बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले.
===Photopath===
170421\17_2_bed_26_17042021_14.jpg
===Caption===
कोरोना वॉर्डमधील रूग्णांशी संवाद साधताना आ.संदीप क्षीरसागर. सोबत डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सचिन आंधळकर आदी.