यावर्षी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन जाहीर केला असल्याने शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत आहे, रोजगार निर्माण होत नसल्याने परिस्थिती डबघाईला आलेली आहे. तरीही नव्या जोमाने पुन्हा एकदा शेतकरी खरीप हंगामातील पेरण्यांसाठी सज्ज झाला आहे. यंदा बियाणे तसेच खतांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान वाटप करा
वडवणी : कर्जमाफीची घोषणा होऊन दोन वर्ष होत आले आहेत. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु दोन वर्षे उलटूनही अद्यापपर्यंत महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांना या अनुदानाची प्रतीक्षा लागली असून नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी हे अनुदान तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मस्के यांनी केली आहे.