पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी प्रयत्न करणार, अजित पवार यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 05:29 AM2023-08-28T05:29:12+5:302023-08-28T07:17:00+5:30

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची १७ ऑगस्ट रोजी सभा झाल्यानंतर रविवारी अजित पवार गटाचीही सभा झाली.

Efforts will be made to bring water from the west to the east, Ajit Pawar's promise | पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी प्रयत्न करणार, अजित पवार यांचे आश्वासन

पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी प्रयत्न करणार, अजित पवार यांचे आश्वासन

googlenewsNext

बीड : सध्या मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. धरणांमधील पाणीसाठाही कमी होत चालला आहे. हाच धागा पकडून आगामी काळात पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करू. यासाठी १ लाख कोटी रुपये लागले तरी चालतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची १७ ऑगस्ट रोजी सभा झाल्यानंतर रविवारी अजित पवार गटाचीही सभा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या काळात केलेली कामे आणि योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे स्थलांतर रोखले जाईल. कांदाप्रश्नी शेतकऱ्यांमध्ये अनेकांनी गैरसमज पसरवले. दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; परंतु कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना दिल्लीला पाठवून हा प्रश्न मार्गी लावला.

कांद्याला प्रति किलो २४.१० रुपये भाव ठरवून २ लाख टन खरेदी केला. शेतकरी सध्या पाऊस नसल्याने अडचणी आहेत. त्यांना मदत आणि आधार देण्याचे काम हे युती सरकार करेल, असेही पवार यांनी सांगितले. 
यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री संजय बनसोडे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अनिल पाटील, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Efforts will be made to bring water from the west to the east, Ajit Pawar's promise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.