छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास व कर्मयोगी संतश्रेष्ठ गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. जी. वानखेडे यांनी केले. कोरोना महामारीमध्ये वाढ होत आहे. कोरोनाला प्रतिबंध करणे म्हणजे वेळोवेळी हात धुणे, मास्क वापरणे व सुरक्षित आंतर ठेवणे या गोष्टीचा विचार करून राजगृह परिसरातील बहुतांश मजूर असलेल्या दीडशे स्त्री-पुरुष बालक, बालिकांना महामानव अभिवादन ग्रुपने मास्क, उपा. स्वाती धन्वे व पूनम जोगदंडला वितरणासाठी दिले. ‘वाचाल तर वाचाल’ या फिरते मोफत वाचनालयाने राजगृह बुध्दविहार केंद्रात ५१ पुस्तकांचा संच उपा. पूनम जोगदंडला मान्यवरांच्या हस्ते डी. जी. वानखेडे यांनी सुपुर्द केला. प्रियदर्शी वाचनालयातर्फे प्रा. अशोक गायकवाड, प्रा. राणी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांकरिता चित्रकलेचे साहित्याचे वितरण केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी अमरसिंह ढाका यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या रयतेच्या राज्याबद्दल सखोल विवेचन केले.
अध्यक्षीय समारोपप्रसंगी उपा.जी. एम. भोले म्हणाले की, प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था, ‘वाचाल तर वाचाल’ फिरते मोफत वाचनालय व महामानव अभिवादन ग्रुप व प्रियदर्शी वाचनालय सतत समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून सतत काम करीत राहतील असे ठोसपणे जाहीर केले.