बीड : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी कामकाजासाठी लागणारे मनुष्यबळ अधिग्रहित होणार असल्याने राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या अधिनयम, १९६० मधील कलम ७३ क क नुसार सहकारी संस्थांच्या निवहणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील २५५ सहकारी संस्थांची निवडणूक स्थगित झाली आहे. तर विविध प्रकारच्या ३९ सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू राहणार आहेत.
बीड जिल्हा सहकारी संस्थांची माहितीएकूण संस्था - ३१५५निवडणूक पूर्ण संस्था- २३१३निवडणूक चालू -३९निवडणूक स्थगित- २५५