कान्होबाची वाडीत अक्षय जाधव, स्वाती सव्वासे,आशाबाई खामकर, संगीता जाधव, मंगल मोरे, राधा मोरे, सोनाली सव्वासे हे विजयी झाले. कोळवाडीत पुजा नेटके, युवराज नेटके, संगीता नेटके, नारायण मानकर, गंगा गिरी, सुषमा शिरसट , सावित्री चव्हाण विजयी झाले. सांगळवाडी ,डोळेवाडीत गोरख डीसले, सुनीता सांगळे, सविता ढाकणे, सुनंदा चेपटे, सुदर्शन सांगळे, तेजस्विनी ढाकणे, सविता अशोक डोळे विजयी झाले.
हाटकरवाडी ,आव्हळवाडीत सिंधुबाई बेलदार, रेणुका सदगर, मल्हारी भंडगर,उज्वला सदगर,नानाभाऊ बडे, तेजस्विनी नागरगोजे, कुसुम आंधळे विजयी झाले. भानकवाडीत पिंटु आरेकर,स्वाती रसाळ,शैला आरेकर, राधा गोरे, रमाबाई साबळे, वैशाली तागड, किसन सोनसळे विजयी झाले. टाकळवाडी ,धनगरवाडी , बरगवाडी ग्रामपंचायतीत सुग्रीव कैतके, ललीता कैतके, द्रोपदी रानमारे, लहुजी रानमारे, बाजीराव कोल्हे, शेवंताबाई वारे, सविता कैतके, राम कोकाटे, सुवर्णा कदम विजयी झाले. यवलवाडी ,वंजारवाडी ग्रामपंचायतमध्ये अतुल सानप, जालींदर सानप, मंगल पालवे, वसंत यवले, आशाबाई सानप, राणी सानप, प्रतिभा यवले, सोनाली सानप, सोनाली यवले यांनी निवडणूक जिंकली. रायमोहा ,दगडवाडी ग्रामपंचायतमध्ये पठाण मुरादखा हुसेन खान पठाण, मेहरूनिस्सा हासम शेख, द्वारका जाधव, सुभाष क्षीरसागर, काकासाहेब जाधव, संगीता सानप, सुरेश जाधव, विमल सानप, जालींदर मंडलीक ,शारदा जायभाय व स्वाती जाधव हे उमेदवार विजयी झाले. तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी निवडणूक निकाल जाहीर केला. ना.त. किशोर सानप ,ना.त.बाळु काका खेडकर ,पालेवाड सह बा.बा जायभाय व मंडल अधिकारी,तलाठी यांनी त्यांना हकार्य केले. पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने व पोलीस उपनिरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
विजेत्यांचा आनंद, पराभुतांनी घर जवळ केले
विजयी उमेदवार गुलाल उधळून आनंद साजरा करत होते तर हार पत्करणारे घर जवळ करत होते. कोळवाडीच्या नवख्या उमेदवाराने पहिल्याच लढ्यात यश खेचुन घेतल्याने विजयी उमेदवार साथीदारांसह नारायण गडावर जाऊन नगद नारायणांचे दर्शन घेतले.