साहित्याचे ढिगारे वाहतुकीला अडथळा
बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण ते टाकरवणफाटा रस्त्याच्या कडेला टाकलेले खडीचे ढिगारे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या ढिगाऱ्यामुळे रस्ता अरूंद होऊन अपघात होऊ लागले आहेत. एक तर रस्ता दुरूस्त करा किंवा रस्त्याच्या बाजुला टाकलेली खडी उचला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ढिगारे टाकण्यात आले, मात्र अद्यापही रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. रस्ता दुरूस्त करून ढिगारे उचलण्याची मागणी आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सेवा मिळत नसल्याने मोबाईलधारक हैराण
बीड : बीड शहर व परिसरातील ग्रामीण भागात बी.एस.एन.एलची मोबाईल सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. समोरच्या व्यक्तीला फोन लावला तरी रेंज उपलब्ध नसते. जर रेंज उपलब्ध असेल तर ती व्यक्ती आऊट ऑफ कव्हरेज एरिया असे सांगितले जाते. अशी स्थिती इंटरनेट कनेक्शनबाबतीतही झाली आहे. सोशल मीडियाचा वापर करतांना मोबाईलमध्ये रेंज दिसते. मात्र, कामकाज होत नाही. अशा स्थितीमुळे मोबाईलधारक हैराण झाले आहेत.