यावेळी अनेकजण उपस्थित होते. आपणही समाजाचे काही देणे लागतो, या उद्दात हेतूने तालुक्यातील धोंडराई येथील शिक्षक व शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन तात्यासाहेब मेघारे यांची डाॅक्टर असलेली मुलगी डाॅ. प्राजक्ता हिचा विवाह येत्या पाच एप्रिल रोजी होणार असून, यात लाॅकडाऊनमुळे विवाह समारंभास परवानगी नसल्याने साधा घरगुती लग्न समारंभ होणार आहे. मात्र, लग्न समारंभात जेवणावर होणाऱ्या खर्चातून आपणही गोरगरिबांच्यासाठी थोडे काम करावे, अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी धोंडराई गावातील चाळीस गरीब व गरजवंतांना अकरा क्विंटल धान्याचे वाटप केले. यावेळी ह. भ. प. अक्रुर महाराज साखरे, उपशिक्षणधिकारी प्रवीण काळम, तात्यासाहेब मेघारे, डाॅ. प्राजक्ता मेघारे, मधुकर तौर, वकील संघाचे अध्यक्ष अमित मुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
===Photopath===
310321\31bed_1_31032021_14.jpg
===Caption===
चाळीस गरिब कुटुंबाला अकरा क्किंटल धान्याचे वाटप करण्यात आले.