शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मासिक ठेव योजनेत अपहार; शाखा डाकपालाविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 6:46 PM

खातेदारांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केला.

ठळक मुद्दे५८ खातेदारांची केली फसवणूक

केज : तालुक्यातील सोनेसांघवी येथील टपाल खात्याच्या शाखा डाकपालाने मासिक ठेव (आरडी) योजनेतील रक्कमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शाखा डाकपाल दत्तात्रय कविदास काळे याच्याविरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुरूवारी (दि.  3 ) ठेवीदार व शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सोनेसांगवी येथील पोस्ट कार्यालयात शाखा डाकपाल या पदावर गावातील दत्तात्रय काळे हे कार्यरत होते. मासिक ठेव योजनेत गावातील ५८ खातेदारांनी शाखा डाकपाल काळे यांच्याकडे ऑक्टोबर २०१५ ते एप्रिल २०१८ या कालावधीत रक्कमेचा भरणा केला होता. त्यांनी या खातेदारांना स्वीकारलेल्या रक्कमेची त्यांच्या पासबुकमध्ये सविस्तर नोंद ही करून दिली आहे. ही मासिक ठेव योजनेत खातेदारांनी भरणा केलेली रक्कम नियमितपणे शासनाकडे जमा करणे आवश्यक असते. परंतू डाकपालपाल काळेने अठ्ठावन खातेदारांनी भरलेली पासष्ठ हजार एकशे पन्नास रुपयांची रक्कम शासनाकडे जमा केली नाही. 

काळे याने खातेदारांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केला. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबाजोगाईचे उपविभागीय डाक निरीक्षक सचिन मल्लिकार्जुन स्वामी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सीमाली कोळी या करत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीBeedबीडCrime Newsगुन्हेगारी