लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : देशात व राज्यात आणीबाणी येते की काय अशी परिस्थिती झाली असल्याची टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. गेवराई येथे आय.टि.आय मैदानावर झालेल्या सभेत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर ‘हल्लाबोल’ केला.
या सभेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेश सरचिटणीस आ. अमरसिंह पंडित, चित्रा वाघ, आ. राजेश टोपे, नवाब मलीक, आ.विक्रम काळे, आ.सतिष चव्हाण, माजी आ.राजेंद्र जगताप, माजी मंत्री प्रकाश सोळुंके, अजिंक्य पाटील, माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित, राकॉचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, जयसिंग सोळुंके आदी उपस्थित होते.
पुढे पवार म्हणाले, भाजप व शिवसेना सरकारच्या राज्यात जनता सुखी नसल्याचे सांगून त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, डिगांबर येवले, आप्पासाहेब गव्हाणे, कुमार ढाकणे, पाटीलबा मस्के, बप्पासाहेब मोटेसह तालुक्यातील शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेपूर्वी पाडळसिंगी ते गेवराईपर्यंत मोटार सायकल रॅली काढण्यात आली.