शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

व्याजाचे पैसे देऊनही मयताची साडे चार एकर जमीन हडपली; दोन सावकारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 6:44 PM

व्याजाचे पैसे परत केल्यानंतरही मयताची जवळपास साडे चार एकर जमीन आपल्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे समोर आला आहे.

बीड : व्याजाचे पैसे परत केल्यानंतरही मयताची जवळपास साडे चार एकर जमीन आपल्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे समोर आला आहे. याप्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात सावकार भावंडाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जमीनीच्या चौकशीसाठी एक तीन सदस्यीय समितीही नियूक्त केल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. दरम्यान, यामध्ये आणखी लोकांची जमीन हडपल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विलास व दत्तात्रय अंगदराव फपाळ (रा.बेलुरा ह.मु.शाहुनगर, माजलगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रामेश्वर गंगाराम उबाळे (रा.दिंद्रुड) यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा मयत भाऊ शिवाजी यांना व्यसन होते. या व्यसनापायी त्यांनी काही कर्ज घेतले होते. २०१० साली त्यांनी आपल्या नावे असलेली जमीन विलास फपाळ यांच्याकडे तारण म्हणून ठेवली. २०१२ साली हा प्रकार त्यांनी कुटूंबियांना सांगितला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. तत्पर्वी शिवाजी यांनी चक्रीवाढ व्याजासह १ लाख ८६ हजार रूपये कर्जाची परतफेड केली होती. त्यानंतर विलास यांनी ही जमीन परत करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी ही जमीन कोणालाही कल्पना न देता आपला भाऊ दत्तात्रय यांच्या नावावर केली. 

हा प्रकार समजल्यावर रामेश्वर यांनी दिंद्रुड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून विलास व दत्तात्रय यांच्याविरोधात ४२०, ४१७, ४१८, ५०६, ३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहा.पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके या करीत आहेत. सपोनि सचिन पुंडगे हे सहकार्य करीत आहेत.

त्रिसदस्यीय समिती नियूक्तकर्ज, जमीन व सावकारीची माहिती काढण्यासाठी आणि आणखी किती लोकांची जमीन हडपली, हे समोर आणण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियूक्त केली आहे. यामध्ये सहायक निबंधक, तहसीलदार एन.जी.झंपलवाड व दिंद्रुड ठाण्याचे सपोनि सचिन पुंडगे यांचा समावेश आहे. ही समिती पंचनामा व इतर माहिती जमा करून सहा.अधीक्षक नवटके यांच्याकडे अहवाल सादर करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

घाबरू नका, तक्रार देण्यास पुढे या - पोलीसया प्रकरणात आणखी काही लोकांची जमीन गहान खत म्हणून ठेवून घेत ती आपल्या नावावर केल्याचे बोलल जात आहे. तसेच यातील आरोपींना राजकीय पाठबळ व गावात दहशत असल्यामुळे नागरिक तक्रार देण्यास पुढे धजावत नाहीत. मात्र आता गुन्हा दाखल झाल्याने नागरिकांनी पुढे येऊन तक्रार द्याव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सोबत आणून आपल्या तक्रारीवर ठाम राहण्यासंदर्भातही पोलिसांनी आवाहन केले आहे.

आरोपींना लवकर अटक करू फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. आरोपींनाही लवकरच अटक करू. तीन सदस्यीय समितीचा अहवाल लवकरच मिळेल. तक्रारदारांना न्याय देण्याचा आमचा पुर्ण प्रयत्न असेल. अन्याय झाल्यास नागरिकांनी न घाबरता पुढे यावे, आम्ही सोबत आहोत. तपास सुरू असून तो लवकरच पूर्ण करू. - भाग्यश्री नवटके, सहा.पोलीस अधीक्षक, माजलगाव

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीBeedबीडPoliceपोलिस