शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

माजलगाव धरण परीक्षेत्र आणि केसापुरी कॅम्पवरील अतिक्रमण हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 19:25 IST

अतिक्रमण ७ दिवसांच्या आत स्वखर्चाने काढण्यात यावे असे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअतिक्रमणधारकांना नोटिस पुनर्वसनाची नागरिकांची मागणी६० ते ७० कुटुंबिय जाणार न्यायालयात

माजलगाव : येथील केसापुरी कॅम्प परीसरात व राष्ट्रीय महामार्ग कल्याण-विशाखापट्टणम क्र.६१ लगत असलेल्या व धरण परीक्षेत्रात वसलेल्या अतिक्रमण धारकांना १० ऑक्टोबर रोजी नोटिस देण्यात आल्या.

माजलगाव उपसा सिंचन शाखा क्र.२ अंतर्गत शाखा अधिकारी यांच्या स्वाक्षरीनीशी जवळपास १५० लोकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. या जागेवरील असलेले अतिक्रमण ७ दिवसांच्या आत स्वखर्चाने काढण्यात यावे असे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे.यामुळे अतिक्रमण धारकांमध्ये खळबळ माजली असून आता तात्काळ आम्ही जायचं कुठं ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

धरण परीक्षेत्रात व रस्त्यालगत तीस ते पस्तीस वर्षापासून आपल्या कुटुंबासह व्यवसाय करुन उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु सदरील क्षेत्र शासन संपादित असल्यामुळे या नागरिकांना येथुन आज ना उद्या स्थलांतरित व्हावे लागणारच आहे. परंतु सध्या सर्वत्र कोविड १९ च्या महामारीमुळे आजवर रोजगार बंद असल्याने यांच्या -वर मोठं संकट उभे असून उपासमारीची वेळ आली असून अचानक आलेल्या नोटिसमुळे सध्या येथील धरण परीक्षेत्रातले नागरिक चिंतेत असून यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत दिलेली असून स्वखर्चाने काढून घेण्यात यावं अन्यथा या कार्यवाहीसाठी जो खर्च लागेल तो रीतसर वसूल करण्यात येईल असा धमकी वजा इशारा देण्यात आलेला आहे. 

६० ते ७० कुटुंबिय जाणार न्यायालयातमाजलगाव धरण परीक्षेत्रात वसलेल्या अतिक्रमण धारक कुटुंबीय या जागेवर राहात असल्याने येथील नागरिकांनी शासनाला १९७६ पासून घरभाडे, वीज बिल,पाणीपट्टी भरल्याच्या ६० ते ७० कुटुंबीयांकडे पोहोच पावत्या पुरावा स्वरूपात उपलब्ध असल्याने सदरील नागरिक न्यायालयात दाद मागणार आहेत. या जागेवरील अतिक्रमण ७ दिवसांच्या आत काढण्यात यावेत, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणBeedबीडEnchroachmentअतिक्रमण