लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण अत्याल्प राहिल्याने यंदाच्या खरीप हंगामातील पिके शेवटच्या घटका मोजत आहे. यावर्षी सरासरीच्या तुलनेत २४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र, हा पाऊस देखील काही तालुक्यात झाला आहे. खरीप हंगामात २ लाख १७ हजार ९१ हेक्टर क्षेत्रावर सोयबीन पिकाचा पेरा करण्यात आला आहे. मात्र, हे नगदी पिक ऐन बहरात असताना पावसाने ओढ दिल्यामुळे शेंगा व फुले गळू लागले आहेत. तसेच पिकाने देखील मान टाकली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.बीड जिल्ह्यातील संपूर्ण अर्थव्यवस्था ही कापूस व सोयबीन या नगदी पिकांवर अवलंबून आहे. मात्र, मागील वर्षीचा दुष्काळ व यावर्षी देखील पावसाची ओढ यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच आर्थिक व मानसिक दृष्ट्या शेतकरी खचून जात आहे. तुरळक पावसावर शेतक-यांनी हंगामाच्या सुरुवातीला पेरण्या उरकल्या होत्या, त्यानंतर थोड्या-फार पावसावर पिके देखील आले मात्र, सोयाबीन पिक ऐन बहरात असताना मागील आठवड्यापासून पावसाचा थेंब देखील पडला नसल्यामुळे पिकाने माना टाकल्या आहेत.ही पिके जगवण्यासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करत आहे. मात्र, निसर्गाच्या कोपामुळे त्याच्या कष्टाचे चीज होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच पावसाअभावी पिकांवर किड व बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव देखील वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या आस्मानी संकटाचा सामना जिल्ह्यातील शेतकरी करत आहे. येत्या दोन दिवसात पाऊस पडला नाही तर सोयाबीनच्या उभ्या पिकात नांगर फिरवण्याची वेळ शेतक-यांवर येणार आहे.पावसाची अपेक्षा शेतक-यांना असल्यामुळे पिकांवर झालेल्या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागडी किटकनाशक फवारली जात आहेत. परंतु, त्याची मात्रा देखील लागू होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.पीक पदरी पडण्याची अपेक्षा नसताना देखील ते जगवण्यासाठी धडपड व खर्च केल्यामुळे हा आतभट्याचा व्यवाहार होत असल्याचे मत शेतक-यांमधून व्यक्त केले जात आहे.कृत्रिम पावसाचा प्रयोग तात्काळ करावाजिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातारवण तयार होत आहे. मात्र, पाऊस पडत नाही. त्यामुळे शासनाने बीड जिल्ह्यात ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल त्या ठिकाणी कृत्रिम पावसाचा प्रयोग तात्काळ कारवा अशी मागणी शेतक-यांमधून केली जात आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत- करपेपुढील दोन ते तीन दिवसात पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर सोयबीन हे पीक पूर्णपणे वाया जाणार आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन शेतक-यांना आर्थिक मदतीची मागणी शासनाकडे कारवी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.
दोन लाख हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:18 AM