यामध्ये विद्यार्थ्यांना कृतिआधारित अध्ययनाच्या माध्यमातून कृषीविषयक ज्ञान दिले जाते. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी प्रात्यक्षिक व लेखी त्याचबरोबर कृषिविद्या, फलोत्पादन, पशुविज्ञान, अन्नशास्त्र, कृषी अभियांत्रिकीकरण, ग्रामीण अर्थशास्त्र व कृषी उद्योग व व्यवसाय गोष्टी जाणून घेत आहेत. प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाला, फुले व फळे यांचे उत्पादन शाळेत उभारलेल्या शेडनेटमधून विद्यार्थी घेत आहेत. तसेच माती परीक्षण, हायड्रोपोनिक्स (मातीविना शेती), दुधातील भेसळ ओळखणे, अनेक आधुनिक शेतीविषयक अवजारे आणि त्यांचा वापर तसेच संशोधित प्रतिकृतीची माहिती विद्यार्थी घेत आहेत. विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान व शेतीवर आधारित व्यवसायाचे ज्ञान देणे व यशस्वी शेतकरी निर्माण करणे. शेती क्षेत्रात नवीन पिढीला नेतृत्व करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी शाळेच्या प्राचार्या भारती बांगर, प्रशासन अधिकारी नूरमिया पठाण प्रकल्पाचे सहायक व्यवस्थापक प्रदीप गरकळ व कृषी शिक्षक नितीन गोडसे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
क्षेत्र भेटीतून मिळतोय अनुभव
अन्नधान्य उत्पादनात वापरण्यात येणारी रसायने, अन्नप्रक्रिया, अन्नसुरक्षितता, पॅकेजिंग व वितरण यांचा अभ्यास करत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना दोन क्षेत्रभेटी आयोजित करून त्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. पोल्ट्री उद्योग, प्रगतिशील बागायतदारांची शेती, दूध डेअरी, साखर कारखाने, नर्सरी व बँक अशा ठिकाणी क्षेत्रभेटी आयोजित केल्या जातात.
शाळेत प्रगतिशील बागायतदार, पशुवैद्यकीय अधिकारी, कृषी अधिकारी व विविध कृषी कंपन्यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्याख्याने आयोजित केली जातात. विद्यार्थी यावेळी आपले प्रश्न विचारून शंकाचे निरसन करून घेतात. व्यवसाय नियोजन स्पर्धेच्या सादरीकरणातून विद्यार्थी शेतीशी निगडित विविध व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांची माहिती घेत आहेत. यासाठी शालेय स्तरावर, विभागीय स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांचे आयोजन केले जाते.
===Photopath===
200221\sakharam shinde_img-20210218-wa0023_14.jpg