उपचारात ढिलाई : अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात आतापर्यंत सर्वाधिक २७४ जणांचा बळी
बीड : कोरोनाबाधितांवरील सुविधा आणि उपचाराबाबत सुरुवातीपासूनच तक्रारी आहेत. अगोदरच लोक घाबरलेले आहेत. त्यातही रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही वेळेवर उपचार होत नसल्याचे आरोप होत आहेत. अशाच कोरोनाबाधित असलेल्या आणि दाखल झाल्यापासून पुढील २४ तासांच्या आता १४७ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत नोंदवलेल्या ६५१ मृत्यूंपैकी २७४ मृत्यू हे एकट्या स्वाराती रुग्णालयात झाल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २५ हजार १७९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पैकी २२ हजार ८८७ कोरोनामुक्त झाले आहेत, तसेच पोर्टलवर ६२६ मृत्यूची नोंद झाली असली तर ऑफलाइन६५१ मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. मागील काही दिवसांपासून तर नव्या बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे, शिवाय मृत्यूसत्रही सुरूच असल्याचे दिसते. ते राेखण्यात प्रशासन आणि आरोग्य विभागाला अपयश आले आहे. सुरुवातीला लोक कोरोनाला घाबरून रुग्णालयाकडे येत नव्हते. तर जे आले त्यांच्याकडेही लवकर लक्ष दिले नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या. याचाच आढावा घेतला असता रुग्ण दाखल झाल्यापासून पुढील २४ तासांच्या आत १४७ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ ते ७२ तासांत १४१, ७२ ते ७ दिवसांपर्यंत १५६, तर ७ दिवसांपेक्षा जास्त राहूनही मृत्यू झालेल्यांची संख्या २०७ एवढी आहे. ही संख्या पाहता आरोग्य विभागाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केवळ ऑडिट आणि कागदोपत्री उपाययोजना करण्यातच प्रशासन धन्यता मानत असल्याने संताप व्यक्त होत आहे. हा दर कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी सामान्यांमधून जोर धरू लागली आहे.
बीड, अंबाजोगाईत मृत्यूने शतक ओलांडले
आतापर्यंत बीड व अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. यात बीड १५९, अंबाजोगाई ११९, आष्टी ५३, पाटोदा २६, शिरूर १९, गेवराई ४७, माजलगाव ४४, वडवणी १२, धारूर ३३, केज ६२, परळी ७२, इतर ५ मृत्यूचा समावेश आहे.
----
महिला ४८१
पुरुष १७०
---
वयोगटानुसार
०-३० ६
३१-५० १००
५१ ते ६० १३७
६१ ते ६५ १०३
६६ ते ७० ११८
७० पेक्षा जास्त १८७
---
महिनानिहाय मृत्यू
जून ३
जुलै २९
ऑगस्ट ११६
सप्टेंबर १८२
ऑक्टोबर ११३
नोव्हेंबर ८०
डिसेंबर ३०
जानेवारी २६
फेब्रुवारी २२
मार्च ५०
----
खाजगी संस्थांमध्ये मृत्यू ४६
शासकीय संस्थांमधील मृत्यू ४०५