बीडमध्ये भाजपच्या वतीने आ. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आरक्षण संवाद बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे मराठा समाजाची फार मोठी हानी झाली आहे. गायकवाड आयोगाचा अहवाल असतानासुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिले गेले नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी संसदेमध्ये कायदा करण्यासाठी भाजपच्या सर्व आमदार, खासदारांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी भाजपचे नेते माजी शिक्षणमंत्री आमदार आशिष शेलार यांच्याकडे केली आहे. यावेळी बुलंद छावाचे बीड जिल्हाध्यक्ष विठ्ठल बहीर, संभाजी ब्रिगेड कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत बागलाने, अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष भागवत मस्के, राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज मस्के, संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष भरत वालेकर आदींची उपस्थिती होती.
मराठा आरक्षणासाठी सर्वांनी पाठपुरावा करावा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:24 AM