लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील आठ दिवसांपासून तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे अज्ञात रोगाने जनावरे दगावत आहेत. या पार्श्वभूमिवर औरंगाबाद येथून आलेल्या विभागीय पथकाने शुक्रवारी गावात पाहणी केली. याच विषयाच्या संदर्भात गुरुवारी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी पशुसंवर्धन अधिकाºयास धक्काबुक्की केली होती. त्यांच्याविरोधात गुरुवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंथरवन पिंपरी येथे डॉक्टरांचे पथक तैनात असून जनावरांना लसीकरण व इतर उपचार सुरु असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.अंथरवन पिंपरी येथे मागील काही दिवसात अज्ञात रोगामुळे जवळपास ३४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गाय,म्हैस यासह शेळी व कोकरांचा समावेश आहे. नेमका आजार कोणता याविषयी माहिती मिळालेली नाही. त्यासाठी मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचे शवविच्छेदन केल्यानंतर सॅम्पल औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतरच नेमका आजार कोणता याचे निदान होणार असून योग्य उपचार सुरु करता येणार आहेत. तोपर्यंत मात्र लसीकरण हा एकमेव पर्याय डॉक्टरांकडे आहे. अंथरवन पिंपरी येथील सर्वच जनावरांवर उपचार सुरु आहेत.त्यानंतर दुसºया दिवशी शुक्रवारी उपचार सुरु असताना एक गाय व दोन शेळ््या दगावल्याची माहिती आहे. याच दरम्यान ज्या शेतकºयांचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी गावातील शेतकºयांनी केली आहे. त्यामुळे रोगाचे योग्य निदान झाले तर जनावरांवर उपचार करता येणार असून जनावरे वाचवता येणार आहेत. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करुन त्यांच्या मार्फत उपचार करावेत, अशी मागणी ग्रामस्थ व शिवसंग्रामच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेनेकडून मदतशिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी अंथरवण पिंपरी येथे भेट देऊन गंगाूबाई वाघमारे यांना ११ हजार रुपयांची वैयक्तिक मदत दिली. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखलयासंदर्भात गुरुवारी पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संतोष पालवे यांना शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली होती.याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा २ वाजण्याच्या सुमारास शिवसंग्रामचे कार्यकर्ते नवनाथ परभाळे, विजय सुपेकर यांच्यासह इतर १० ते १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.गुन्हे दाखल होऊ नये यासाठी आ. विनायक मेटे रात्री उशीरापर्यंत शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून होते.मात्र पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी हा विषय गंभीर असून अधिकाºयांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशा सूचना पोलीस अधिक्षकांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे रात्री उशिरा २ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.जि.प.मधील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर कार्यकर्त्यांची ओळख पटवली जाणार आहे.या प्रकरणी तपास करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री मुंडे यांनी दिल्याची सूत्रांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील अंथरवन पिंपरीत पशुधनाची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:07 AM
मागील आठ दिवसांपासून तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे अज्ञात रोगाने जनावरे दगावत आहेत. या पार्श्वभूमिवर औरंगाबाद येथून आलेल्या विभागीय पथकाने शुक्रवारी गावात पाहणी केली. याच विषयाच्या संदर्भात गुरुवारी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी पशुसंवर्धन अधिका-यास धक्काबुक्की केली होती.
ठळक मुद्देविभागीय पथक धडकले : पशुसंवर्धन अधिकाऱ्याला धक्काबुक्कीप्रकरणी राजपत्रित अधिका-यांचे पोलिसांना निवेदन