यावेळी डॉ.अनिता निर्मळ (सीएचओ निपाणी, जवळका) यांनी गर्भवती माता यांना विविध समस्यांवर मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने १६ गर्भवती महिलांना मोफत सोनोग्राफी करण्यासाठी पत्राचे आरोग्य केंद्राच्या वतीने वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ आरोग्यसेविका मीरा बुंदिले, नर्मदा जाधव, शिल्पा नरवडे, राधिका कोल्हे, अर्चना हनुमाने, उघडे, आशा विभागातील गटप्रवर्तक उषा बारगजे, दीपाली काळे यांच्यासह अमोल पत्की यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका बहुसंख्येने उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र निपणी जवळका येथे प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला आरोग्य केंद्राच्या वतीने गर्भवती मातांची तपासणी केली जाते. यामध्ये आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ९ प्राथमिक उपआरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ४४ गावांतील महिलांची तपासणी करण्यात आली, असे निपाणी जवळका प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.धनंजय माने यांनी सांगितले.