बीड : आरोग्याच्या दृष्टीने माहिती नसलेल्या; परंतु शरीरास अपायकारक असलेल्या अनेक गोष्टी आहेत. यात शरीरात पाणी जास्त झाले अथवा कमी झाले तरी ते त्रासदायक ठरत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी १८ वर्षांवरील व्यक्तींनी दिवसाकाठी ४ ते ५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
शरीराला पाण्याती अत्यंत गरज आहे; परंतु त्यातही मर्यादा घालून देण्यात आलेल्या आहेत. आपण पाणी पिल्यानंतर ते बाहेरही तेवढ्याच प्रमाणात पडते. घाम, लघवी, उलटी आदींच्या माध्यमातून शरीरातील पाणी कमी होते, तसेच काही लोक जास्तीचे पाणी पितात; परंतु तेदेखील शरीराला अपायकारक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अन्नसेवनासह पाणी पिण्यालाही मर्यादा घालण्याची गरज आहे.
--
शरीरात पाणी कमी पडले तर...
शरीरात पाणी कमी पडले, तर तहान जास्त लागते. तसेच बेचैन होणे, बेशुद्ध पडणे, दम लागणे, जागरूकतेवर परिणाम हाेणे, ब्लड प्रेशर लो होणे आदी त्रास होतो. उलटी, संडास, गरमी, डायबिटिस यामुळे शरीरातील पाणी कमी होते.
--
शरीरात पाणी जास्त झाले तर...
शरीरात मर्यादेपेक्षा जास्त पाणी झाले, तर दम लागतो. तसेच अंगावर सुज येणे, धडधड होणे यासारखा त्रास होतो; परंतु ज्यांची किडनी सक्षम आहे, त्यांना याचा त्रास होत नसल्याचे सांगण्यात आले.
--
१८ वर्षांवरील व्यक्तीने दिवसाकाठी ४ ते ५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात जास्त पाणी झाले अथवा कमी पडले तरी त्रास होतो. नागरिकांनी थोडाही त्रास जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. यशवंत खाेसे, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ, बीड
--
१८ व त्यापुढील वयोगट - दिवसाकाठी ४ ते ५ लिटर पाणी प्यावे
220921\22_2_bed_1_22092021_14.jpg
डॉ.यशवंत खोसे