धारूर : तालुक्यात तीन महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल यंत्रणा कामाला लागली आहे. सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तहसील कार्यालयाने तलाठी कृषी सहायक व ग्रामसेवकांना कामाला लावले आहे. गुरुवारी दुपारपर्यंत नुकसानीचे पंचनामे होणे अपेक्षित आहे.
..
हळद पीक हातचे गेले
कोळपिप्री भागात अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेले हळदीचे पीक वाया गेले. शेतात पाणी झाल्याने हे पीक सडले आहे, असे युवक शेतकरी दादा बुरसे यांनी सांगितले.
...
धारूर तालुक्यात तिनही मंडळात अतिवृष्टी झाली आहे. शेतीतील पिकाचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून गुरुवारी दुपारपर्यंत नुकसानीचा आकडा येईल, असे नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी सांगितले.
...
080921\img-20210908-wa0038.jpg
रुईधारूर येथे पिकाचे नुकसान