फोटो
सावरगाव शिवारात बाजरी काढणी सुरू
शिरूर कासार : तालुक्यात सुरुवातीला पेरणीलायक पाऊस झाला होता. त्यामुळे लवकर बाजरीचा पेरा झाला होता. आता बाजरी काढणीला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय, काढलेला उडीद तयार करून घरी आणण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
डोंगरदऱ्यात पाणी झुळूझुळू वाहू लागले
शिरूर कासार : दुष्काळाचे सावट, नदी-नाले कोरडेठाक दिसत असतानाच दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने डोंगरदऱ्यांतून पाणी खळखळ वाहत असल्याचे मोहक चित्र दिसत आहे, तर मुक्त पशुपक्ष्यांना पाणी उपलब्ध झाले असल्याचे दिसून येत आहे.
सिद्धेश्वर संस्थानवर नामजप सप्ताहाला प्रारंभ
शिरूर कासार : तालुक्यातील धाकटी अलंकापुरी असलेल्या सिद्धेश्वर संस्थानवर
मंगळवारपासून महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ओम नमः शिवाय’ नामजप सप्ताह सुरू झाला असून साखळी पद्धतीने एक एक तास ग्रामस्थ वीणा घेऊन नामजप करत आहेत. कोरोना नियमांमुळे याहीवर्षी फारसा बोलबाला न करता परंपरा जतन केली जात आहे. पोळा झाल्यानंतर मंगळवारी नामजप सप्ताहाची सांगता होणार आहे.
--------
पोळ्याबाबत तालुक्यातील शेतकरी संभ्रमात
शिरूर कासार : सोमवारी बैलपोळा हा सण आहे. बैलांना स्नान घालण्यासाठी सिंदफना नदी खळखळून वाहू लागली तर पाऊस झाल्याने बैलपोळ्याचा उत्साह द्विगुणित झाला आहे. परंतु अद्यापही मंदिर, प्रार्थनास्थळ, कोरोनामुळे बंद आहेत. आठवडी बाजार देखील बंदच आहेत. मग यावर्षी बैलाची मिरवणूक वेशीतून तोरणाखालून जाईल की नाही, याबाबत सर्वांच्या मनात संभ्रम आहेच. तसे न झाल्यास बैलांना दावणीवर नैवेद्याचे घास भरवावे लागणार आहे.
010921\153-img-20210901-wa0040.jpg
फोटो