शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

पावडर कोटिंगच्या कारखान्यातील स्फोटाने बीड हादरले; एकाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 4:25 PM

संतोष व त्यांचे बंधू जगदीश यांनी तीन वर्षांआधी अ‍ॅनोडाझींग व पाडर कोंटींगचा व्यवसाय सुरू केला होता.

ठळक मुद्देया भीषण स्फोटात तिघे जखमी झाले आहेत मोठा आवाज झाल्याने परिसर हादरला

बीड : पांगरी रोडवर असणाऱ्या गिरामनगर भागातील अ‍ॅनोडायझिंग आणि पावडर कोटिंग कारखान्यात भट्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्रेसर व गॅसचा मंगळवारी दुपारी दोन वाजता स्फोट झाला. या स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला. तिघे गंभीर जखमी झाले. संतोष दामोदर गिराम (३२, रा. गिरामनगर, पांगरी रोड) असे स्फोटातील मयताचे नाव आहे. त्यांचे बंधू जगदीश दामोदर गिराम, अनिल गांडुळे व एक परप्रांतीय मजूर गंभीर जखमी झाले आहेत. 

संतोष व त्यांचे बंधू जगदीश यांनी तीन वर्षांआधी अ‍ॅनोडाझींग व पाडर कोंटींगचा व्यवसाय सुरू केला होता. त्याठिकाणी खिडक्या, दरवाजे व अ‍ॅल्युमिनियमचे साहित्य तयार केले जाते. सोमवारी दुपारी कारखाना मालक संतोष गिराम, त्यांचे बंधू जगदीश गिराम, अनकेत गांडुळे व एक परप्रांतीय कामगार, असे चौघे जण तेथे काम करत होते.अ‍ॅल्युमिनियमला रंग देण्यासाठी असलेल्या भट्टीत काम सुरू असताना अचानक हवेचा उच्चदाब असलेले कॉम्प्रेसर फुटून मोठा स्फोट झाला. या उच्चदाबाच्या हवेमुळे कारखान्यातील सगळेच जण उडून बाजूला पडले. यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसर हादरून गेला होता. आवाज झाल्याने शेजारी हॉटेलमध्ये व फरशीच्या कारखान्यात असलेल्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. 

गंभीर जखमी झालेल्यांना उपचारासाठी तात्काळ एका खाजगी दवाखान्यात नेले. यावेळी डॉक्टरांनी तपासून यातील संतोष गिराम यांना मृत घोषित केले. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपाधीक्षक भास्कर सावंत, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील बिर्ला, उपनिरीक्षक गणेश गोडसे यांनी भेट दिली. दरम्यान संतोष गिराम यांचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. 

नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर संतोष गिराम व जगदीश गिराम यांनी मोठ्या कष्टाने अ‍ॅनोडायझिंग व पावडर कोटिंग कारखाना सुरू केला होता. जेमतेम बेताची परिस्थिती असतानाही त्यांनी हा व्यवसाय वाढवला होता. मात्र, स्फोटात संतोष गिराम यांना आपला जीव गमवावा लागला. 

कारखान्याचे मोठे नुकसान कारखान्यात पावडर कोटिंगच्या कामासाठी गॅसचादेखील वापर केला जातो. मात्र, त्याची वेगळी रांग केलेली असल्यामुळे या स्फोटाचा परिणाम त्यावर झाला नाही. त्यामुळे अनर्थ टळला. उच्चदाब हवा असलेले कॉम्प्रेसर फुटल्याने कारखान्याचे लोखंडी अँगल वाकले असून, मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडbusinessव्यवसाय