लोकमत न्यूज नेटवर्ककडा : पाच ते सहा वर्षांपासून कांदा या नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आष्टी तालुक्यात घेतले जात आहे. कांदा उत्पादनासाठी पोषक असे वातावरण व जमिनीची मात्रा चांगली असल्याने कांद्याचे उत्पादन दर्जेदार व मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये होते. त्यामुळे आष्टी तालुक्यातील कांदा हा हैदराबाद, बेंगलोर, पुणे, पनवेल, येवला, एवढेच नाही तर परदेशातही पोहोचला आहे. कडा बाजार समिती ही कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील मोठमोठे व्यापारी कांदा खरेदीसाठी याठिकाणी येतात. परंतु यावर्षी ऐन दुष्काळातही तालुक्यात काही प्रमाणात कांदा उत्पादन झाले असून, कांद्याला भाव नसल्याने कांदा मार्केटमध्ये विकण्याऐवजी कांद्याचा मुक्काम शेतातच आहे.आष्टी तालुक्यातील प्रामुख्याने देवळाली, लोखंडवाडी, धामणगाव, घाटपिंपरी, दादेगाव, बीड-सांगवी, देसूर, बेलगाव, किनी, डोंगरगण, सावरगाव, वेलतुरी या व अशा अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड झाली होती. पावसाअभावी ५० ते ६० टक्के कांदा जागेवर जळून गेला आहे. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान दुष्काळामुळे झाले आहे. तर ज्या शेतकºयांनी जिवापाड जपून कसेबसे कांदा पीक जगवून चांगले उत्पादन घेतले त्यालाही भाव मिळत नाही. जिवापाड जपलेल्या कांद्याला आज मात्र कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कांदा आज आपल्याला शेतामध्येच पडून राहिलेला दिसत आहे. कांदा पिकाचे उत्पादन कमी होऊनही आज कांद्याला मात्र पाच ते आठ रुपये भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा उत्पादनासाठी प्रति किलो पाच ते सात रुपये खर्च येतो त्यामुळे झालेला खर्चही निघेल का नाही या चिंतेमध्ये शेतकरी आहे. त्यामुळे सरकारने काही तरी ठोस भूमिका घेऊन कांद्याला योग्य भाव द्यावा अशी मागणी शेतकरी बबन रांझणे, माणिक तळेकर यांनी केली आहे.
निर्यात होणाऱ्या कांद्याचा मुक्काम यंदा शेतातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:38 AM
पाच ते सहा वर्षांपासून कांदा या नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आष्टी तालुक्यात घेतले जात आहे. कांदा उत्पादनासाठी पोषक असे वातावरण व जमिनीची मात्रा चांगली असल्याने कांद्याचे उत्पादन दर्जेदार व मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये होते.
ठळक मुद्देकांद्याचा वांदा : भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात