शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; अंभोरा पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2023 5:39 PM

किती ठिकाणी चोऱ्या केल्या याची चौकशीअंती उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- नितीन कांबळे कडा- अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून टाॅवरच्या बॅटऱ्या चोरून त्याची अहमदनगर शहरात विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी टोळीतील तीन जणांना बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. 

आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील चिंचेवाडी येथील बीएसएनएल टाॅवर च्या ६५ हजार रूपये किमतीच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याचा १७ मे २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून अंभोरा पोलिस आरोपींच्या शोधत होते.तालुक्यातील नांदुर विठ्ठलाचे येथील तीन  जणांनी ही चोरी केल्याची माहिती अंभोरा पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फॅत समजाताच त्यांनी आरोपी सोपान वाघुले,सुखदेव खिळदकर, विनोद खिळदकर, रा.नांदुर विठ्ठलाचे ता.आष्टी, यांना बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिल्याने अटक करण्यात आली. किती ठिकाणी चोऱ्या केल्या याची चौकशीअंती उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे,पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने,आदिनाथ भडके,अंमलदार उध्दव गडकर, शिवदास केदार, अमोल शिरसाठ, रविंद्र राऊत, सतिश पैठणे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड