आ. नमिता मुंदडा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अंबाजोगाई : तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही अद्याप त्यांचा हरभरा खरेदी करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी बीड जिल्ह्यात शासकीय खरेदीसाठी वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आ. मुंदडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी हरभरा खरेदीसाठी नोंदणी केल्या आहेत. बनसारोळा (ता. केज) व केज तालुका खरेदी-विक्री संघात दोन्ही ठिकाणी अंदाजे ५०० शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही त्यांचा हरभरा अद्यापही खरेदी केला गेला नाही. बनसारोळा येथे
१७ ते जून
या कालावधीत बारदाना उपलब्ध नसल्यामुळे खरेदी केंद्र बंद होते. २५ जून ही तारीख खरेदीची शेवटची तारीख होती. खरेदी बंद झाल्यामुळे बाजारात हमीभावापेक्षा एक हजार रुपयापेक्षा कमी भाव आहे, तसेच पाऊस पडल्यामुळे हरभऱ्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दड होत आहे, तरी शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी बीड जिल्ह्यात शासकीय खरेदीसाठी वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी आ. मुंदडा यांनी केली आहे.