धारुर
: तालुक्यात डॉक्टर,पोलीस,आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकसुद्धा कोरोना रोखण्यासाठी अतिशय जबाबदारीने कार्य पार पाडत आहेत. त्यांना प्रशासनाने योग्य त्या सुविधा द्याव्यात असे निवेदन येथील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने देण्यात आले.
सध्या कोरोनाचे संकट संपूर्ण राज्यावर ओढावलेले आहे. कोविड नियंत्रणासाठी कर्तव्यावर नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना सॅनिटायजर, मास्क, ग्लोज, पीपीई किट, थर्मल गन, ऑक्सिमीटर अशी सुरक्षेची साधने पुरवली जात नाहीत. ही साधने पुरवावीत तसेच शासनाने मागील वर्षी जाहीर केलेल्या ५० लाखांच्या विम्याची मुदत वाढवावी. जिल्हा परिषद व संस्था शिक्षकांची एकत्रित यादी करून रोटेशन पद्धतीने सर्वांना ड्यूटी द्यावी, असे निवेदन तहसीलदार,तालुका आरोग्य अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.