शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

माजलगावात सफाई कामगारांचे न.प.समोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 12:52 AM

येथील नगरपालिकेने सफाई कामगारांच्या पगारातून दहा महिन्यांपासून कपात केलेले कर्जाचे हप्ते बँकेत भरावे व तीन महिन्यांचे वेतन तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी बुधवारी सफाई कामगाराने न.प.कार्यालयासमोर उपोषण सुरु केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : येथील नगरपालिकेने सफाई कामगारांच्या पगारातून दहा महिन्यांपासून कपात केलेले कर्जाचे हप्ते बँकेत भरावे व तीन महिन्यांचे वेतन तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी बुधवारी सफाई कामगाराने न.प.कार्यालयासमोर उपोषण सुरु केले.माजलगाव न.प.ने सफाई कामगारांचे वेतन अदा करताना बँकेच्या कर्जाचे हप्ते दहा महिन्यांपासून कपात केले होते. परंतु ती रक्कम बँकेत भरली नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची खाते थकितमध्ये जावून त्यांना बँकेच्या नोटीसा आल्या आहेत व तीन महिन्यांपासून वेतन न झाल्याने हे सफाई कामगार आर्थिक तंगीत सापडले असून, सध्या सणासुदीचे दिवस असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने या सफाई कामगाराने कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. तात्काळ हप्ते वर्ग करुन तीन महिन्यांचे वेतन देण्याची मागणी केली आहे. उपोषणात अशोक सुतार, अभिमान टाकणखार, राम मिसाळ, रमेश भिसे, चत्रभूज मिसाळ, चतुराबाई खळगे, सीताबाई कांबळे, जपानबाई वाल्मिकी, मधुबाला जावळे आदींसह ५२ कामगार उपोषणास बसले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने कर्मचाºयांची पगार व कपात हप्ते व्याजासह तात्काळ भरणा करावेत, अशी मागणी राँका नगरसेवक शेख मंजूर यांनी केली आहे.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन