लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जायकवाडी प्रकल्पातील पाणी वाटपाचे फेरिनयोजन शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. आता माजलगाव धरणासाठी ५६० दलघमीवरून २९९.४२ दलघमी एवढी पाण्याची तरतूद या शासनाने कमी केली आहे. त्यामुळे बीड शहरासह इतर ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी आ.अमरसिंह पंडित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून बीड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पत्रकार परिषदेस अॅड.उषाताई दराडे, जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, अॅड.डी.बी.बागल, बीड तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, पाटोदा तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव, गेवराई तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील उपस्थित होते. मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षणासह भ्रष्टाचारमुक्त, टँकरमुक्त, टोलमुक्त आणि लोडशेडींग मुक्त महाराष्ट्र करण्याचा दिलेला शब्द शासनाने फिरविला. त्यामुळे मतदार आता भाजपा-शिवसेनामुक्त शासन निवडतील, जायकवाडीच्या हक्काच्या पाण्याबाबत शासन जाणीवपूर्वक विलंब करत आहे. धरणातील पाणी वापराचे फेर नियोजन करताना बीड जिल्ह्यावर सरकारने अन्याय केला आहे. अच्छे दिनच्या नावाखाली या सरकारने जनतेची फसवणूक केल्याची टीकाही माजी आ.अमरसिंह पंडित यांनी यावेळी केली.जलयुक्त शिवार ही योजना केवळ गुत्तेदारांसाठी राबविण्यात आली, त्याचा प्रत्यक्ष लाभ सिंचनासाठी झालाच नाही. हमीभावाने धान्य खरेदी करताना शेतकºयांची परवड केली, कोट्यवधी रु पये आजही शेतकºयांना मिळालेले नाहीत. मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या आश्वासनाचा विसर शासनाला पडला आहे. इंधन दरवाढ, महागाई आणि बेरोजगारी कमी झाली नाही.पिक विमा नुकसान भरपाई, बोंडअळीचे अनुदान, गारपीटग्रस्तांची मदत अद्याप शेतकºयांना मिळाली नाही. घोषणा हवेत विरल्या आहेत. त्यामुळे आता वेळ आली आहे भाजप-सेना मुक्त शासन देण्याची, अशी टिकाही पंडित यांनी पत्रपरिषदेत केली.पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यकर्त्यांना दुष्काळाचे गांभीर्य नाही, बीड जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी करण्यासाठी इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना का यावे लागते?, बॅटरी लावून अंधारात दुष्काळ दिसतो का? असा सवाल करून टंचाईच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शासन कोणतीही उपाययोजना करत नसल्याची टिकाही त्यांनी केली. जायकवाडी पाणी वाटपाबाबत बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नसताना जायकवाडीत पाणी सोडण्याचे का थांबले ? मराठवाड्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार, लोकप्रतिनिधी या प्रश्नावर का बोलत नाहीत?, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या दबावाला शासन बळी पडले असून त्यामुळेच पाणी सोडण्यासाठी विलंब होत आहे, असेही ते म्हणाले. महिलांवरील अत्याचार या सरकारच्या काळात वाढले असून बीड जिल्ह्यात आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची टिका राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या अॅड. उषाताई दराडे यांनी केली. राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेला जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, जिल्हा सरचिटणीस कुमार ढाकणे, माजी उपनगराध्यक्ष फारु क पटेल, नगरसेवक खदीरभाई जवारीवाले, परदेशी मॅडम, प्रा.गोपाळ धांडे, जीवन जोगदंड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी या पत्रकार परिषदेस उपस्थित होते....तर लोकसभा लढविणारलोकसभेसाठी मी स्वत:हून इच्छूक नाही परंतु पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढविणार. उमेदवार कुणीही असला तरी राष्टÑवादी काँग्रेसचाच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार, असे अमरसिंह पंडित यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
जायकवाडी पाणीवाटपाचे फेरनियोजन अन्यायकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 1:06 AM
जायकवाडी प्रकल्पातील पाणी वाटपाचे फेरिनयोजन शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. आता माजलगाव धरणासाठी ५६० दलघमीवरून २९९.४२ दलघमी एवढी पाण्याची तरतूद या शासनाने कमी केली आहे.
ठळक मुद्देअमरसिंह पंडित यांची टीका जनतेचा भ्रमनिरास