शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पुण्यातील हलवायांना विकली जात होती बनावट खव्याची मिठाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:09 AM

तालुक्यातील उमरीफाटा येथील बनावट खवा बनविणाऱ्या विशाल डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून बनावट खव्यासाठी वापरण्यात येणारे ९ लाख ६६ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले असून डेअरी सीलबंद केली आहे.

ठळक मुद्देअन्न व औषध विभागाची कारवाई : उमरी फाटा येथील विशाल डेअरीला सील ठोकले; ९ लाख ६६ हजारांचे साहित्य जप्त

केज : तालुक्यातील उमरीफाटा येथील बनावट खवा बनविणाऱ्या विशाल डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून बनावट खव्यासाठी वापरण्यात येणारे ९ लाख ६६ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले असून डेअरी सीलबंद केली आहे. या डेअरीतील खव्यापासून बर्फी बनवून ती पुण्यासह इतर ठिकाणच्या हलवायांना विकली जात होती, असे चौकशीत पुढे आले असून सर्व नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाºया या डेअरीवरील कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे.केज तालुक्यातील उमरीफाटा येथील विशाल डेअरी येथे बनावट खवा बनविला जात असल्याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन बीडचे सहाय्यक आयुक्त श्रीकृष्ण दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे व ऋषिकेश मरेवार यांनी गुरुवारी विशाल डेअरीवर छापा टाकून कारवाई केली.डेअरीत रत्ना गोल्ड वनस्पती, समर्थ रिफाइन्ड सोयाबीन तेल, साखर व दुध पावडर यांचे मिश्रण तयार करून बनावट खवा उत्पादन केले जात होते. अशा बनावट खव्यापासून संस्कार ब्रँड बर्फी तयार करून ती आकर्षक पॅकिंग करून पुणे व सतर ठिकाणच्या स्वीटमार्ट दुकानांना विक्री केली जात असल्याचे चौकशीत आढळून आले.अन्न व औषध प्रशासन विभागाची ही कारवाई गुरुवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत सुरु होती. घेतलेल्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी होणार आहे.परवानगीआड गोरखधंदासदरील विशाल डेअरीने अन्न व औषध प्रशासन बीड कार्यालयातून केवळ दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करण्याचा परवाना घेतला आहे. प्रत्यक्षात मात्र येथे दुधापासून खवा न बनविता रत्ना गोल्ड वनस्पती, समर्थ रिफाइन्ड सोयाबीन तेल, साखर व दुध पावडर यांचे मिश्रण तयार करून बनावट खवा उत्पादन केले जात होते.

टॅग्स :BeedबीडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग