गेवराई : कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या परिवारातील सदस्यांनी होम क्वारंटाईन राहावे, तसेच विनाकरण घराबाहेर पडू नये, स्वत :बरोबर आपल्या परिसरातील लोकांची काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले.
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात ऑक्सिजन सिलिंडरची गरज पडत आहे. तसेच सेवाभावी संस्था, समाजसेवक, सिलिंडर दुकानवाले, खासगी दवाखाने अशा अनेकांना आवश्यक सहकार्याचे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. शहरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक विनाकारण बाहेर फिरत आहेत, त्यांनी होम क्वारंटाईन झाल्यास संसर्गाचा धोका टळेल. जान है तो जहान है, असे सांगून खाडे म्हणाले, या संकटातून लवकर बाहेर पडण्यासाठी गेवराईकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे. नागरिकांनी विना मास्क फिरू नये, घरी राहावे, विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.