प्रभात बुडूख।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या उच्चपदावरील व्यक्तीशी किंवा तरुणांशी शरीर सुखाचे प्रलोभन दाखवून जवळीक साधून त्यांनी केलेल्या कृत्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करून लाखों रुपये उकळण्याचे प्रकार घडत आहेत, याला ‘हनी ट्रॅप’ असे म्हणतात. या ट्रॅपच्या विळख्यात उच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्ती व तरुणाई ओढली जात आहे. मात्र, समाजात आपली बदनामी होईल म्हणून असे प्रकार उघडकीस येत नाहीत.अशाच प्रकारे ‘हनी ट्रॅप’मध्ये गेवराई येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापक अडकल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला होता. त्यांना २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यावेळी ५ लाखांचा धनादेश व ५ तोळ््याची अंगठी देण्याचे कबूल केले होते. मात्र, त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्राध्यापकाने तक्रार दिल्यामुळे या प्रकरणातील तीन पुरुष व दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे, मात्र अशा प्रकारे ‘हनी ट्रॅप’च्या विळख्यात अडकवणारी टोळी जिल्हाभरात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांमधून व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे.‘हनी ट्रॅप’ करण्यासाठी सुरुवातीला एखाद्या महिलेच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्यक्तीशी किंवा तरुणाशी संवाद साधला जातो. त्याला शारीरिक सुखाचे प्रलोभन देऊन आक र्षित केले जाते. त्यानंतर अश्लिल चॅटींग केली जाते.पुढील व्यक्ती किंवा तरुणाला आपल्या जाळ््यात ओढल्यानंतर त्याच्यासोबत एखाद्या लॉजवर किंवा इतर ठिकाणी बोलावून त्याच्यासोबत गैरकृत्य केले जाते. तो व्यक्ती शारीरीक सुखाच्या आहारी गेलेल असल्यामुळे आपले चित्रीकरण केले जात आहे, याची जाणीव देखील त्याला होत नाही. सर्व काही झाल्यानंतर काही दिवसांनी या टोळीमधील व्यक्ती संबंधिताकडे जाऊन व्हिडीओ रेकॉर्डिंग दाखवून लाखों रुपयांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून क्लिप व्हायरल करण्याची धमकी देखील दिली जाते. त्यामुळे आपली बदनामी होईल, या भितीने निमूटपणे मागेल ती रक्कम दिली जाते व गुन्हा किंवा फिर्याद दाखल करण्यासाठी देखील कोणी पुढे येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे ‘हनी ट्रॅप’ टाकणारे निर्ढावल्याने आपला गोरख धंदा सुरुच ठेवतात.दोन दिवसापुर्वी गेवराईत उघडकीस आलेल्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील आणखी किती जणांना अशा प्रकारे गंडा घातला आहे. तसेच ‘हनी ट्रॅप’च्या विळख्यात अडकवणाºया किती टोळ््या सक्रिय आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.नग्न चित्रफित केली जाते तयार‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या व्यक्तीला किंवा महाविद्यालयातील तरुणाला ती महिला एखाद्या अनोळखी ठिकाणी लॉजवर किंवा घरी बोलावते, त्यानंतर महिलेसोबत शय्यासोबत करतानाची नग्न चित्रफित त्या व्यक्तीला न कळू देता बनवली जाते.तसेच हा गैरप्रकार सुरु असताना त्या टोळीतील संबंधित महिलेचा पती, भाऊ, किंवा नातेवाईक बनून अचानक घरी जातो व हे गैरकृत्य करताना रंगेहात पकडतो. हे सर्व ‘हनी ट्रॅप’मध्ये ठरलेले असते, त्यानंतर या सर्व पुराव्यांचा आधार घेऊन त्या व्यक्तिला बदनाम करु किंवा अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन अशा प्रकारे धमकावून ब्लॅकमेल केले जाते व त्याच्याकडून लाखो रुपये उकळले जातात.
उच्च पदावरील व्यक्तींसह तरुण ‘हनी ट्रॅप’च्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:27 AM
सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या उच्चपदावरील व्यक्तीशी किंवा तरुणांशी शरीर सुखाचे प्रलोभन दाखवून जवळीक साधून त्यांनी केलेल्या कृत्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करून लाखों रुपये उकळण्याचे प्रकार घडत आहेत, याला ‘हनी ट्रॅप’ असे म्हणतात.
ठळक मुद्देखंडणीखोरांचा असाही फंडा : सोशल मीडियातून सावज शोधण्याचे गुन्हेगारांचे षडयंत्र