लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांची बीड स्थानिक गुन्हे शाखेत तर अंबाजोगाई येथील रोहित बेंबरे यांची अंभोरा पोलीस ठाण्यात बदली झाली. पदभार स्वीकारल्यानंतर जुन्यांना निरोप तर नव्याचे स्वागत शनिवारी करण्यात आले.
अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांचा येथील ठाण्याचा कार्यकाळ संपला आहे. त्यांनी हद्दीत कायम शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम केले. त्यांची कारकीर्द चांगली राहिली. त्यांची बीड येथे स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. त्यांच्या जागी अंबाजोगाई येथील रोहित बेंबरे यांची अंभोरा येथे बदली झाली आहे. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
280821\20210828_163527_14.jpg
कुकलारे बीडला तर बेंबरे अंभो-याला