लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप व रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याच काळात बोंडअळीचे ८५ कोटी व अतिवृष्टीची ६८.१५ कोटी मदत निधी वर्ग होऊन महिना उलटूनही अनेक शेतकरी मदत निधीपासून वंचित आहेत.यावर्षी खरिपाच्या ७ लाख ८० हजार हेक्टरपैकी ३ लाख ६९ हजार ४४ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड केली होती. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती व बोंडअळीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच कापूस लागवडीचा खर्च देखील मिळाला नसल्यामुळे बोंडअळी अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानंतर शासनाने २५६ कोटी रुपये अनुदान जाहीर केले. परंतु अनुदान वाटपात प्रशासन व जिल्हा बँक अक्षम्य हलगर्जीपणा करत असल्याचे शेतकºयांनी सांगितले.दुष्काळी परिस्थितीमुळे रबीचा पेरा अवघा २० टक्के झाला आहे. या परिस्थितीत शेतकºयांना शासनाच्या वतीने बोंडअळीचे २५६ कोटी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. तसेच २०१६ मधील अतिवृष्टी बाधित शेतकºयांसाठी ६८ कोटी १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र बोंडअळीची तिन्ही टप्प्यातील मदत वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच अतिवृष्टी बाधित शेतकºयांना मिळणारी मदत जाहीर होऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र, मदत वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
मदत जाहीर होऊनही शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:39 AM
जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप व रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
ठळक मुद्देबोंडअळी, अतिवृष्टीचे अनुदान रखडले : दुष्काळी परिस्थितीत तात्काळ अनुदान देण्याची मागणी