लोकमत न्यूज नेटवर्कबीड : व्याजाने दिलेल्या पैशाच्या कारणावरुन एका शेतकºयास मारहाण करीत दारूमधून विषारी द्रव पाजून त्याचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे सोमवारी घडली. या प्रकरणी मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरून तलवाडा ठाण्यात मंगळवारी ६ जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला.भानुदास गेना शिंदे (४० रा. तलवाडा) असे मयत शेतकºयाचे नाव आहे. तर बबन श्रीराम हात्ते, रोशन विठ्ठल हात्ते, गणेश विक्रम शिंदे, बाळू श्रीराम हात्ते, भरत सुभाष शिंदे आणि रमेश विक्रम शिंदे (सर्व रा.तलवाडा) अशी आरोपींची नावे आहेत. भानुदास शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे याने तलवाडा ठाण्यात नमूद केल्यानुसार, वरील सहा आरोपींनी भानुदास शिंदे यांना व्याजाने दिलेल्या पैशाच्या कारणावरुन शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. जिवे मारण्याच्या उद्देशाने धमक्या देवून त्यांना दारूमधून विषारी द्रव पाजले. अत्यावस्थ अवस्थेत ते सायंकाळी घरी परतले. त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने नातेवाईकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी सुरूवातीला तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर सोमवारी रात्री जिल्हा रूग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. परंतु उपचार घेत असताना मंगळवारी पहाटे भानुदास शिंदे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहा जणांविरुध्द तलवाडा ठाण्यात खुनासह इतर कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे करीत आहेत. दरम्यान, यातील एकाही आरोपीला रात्री उशिरापर्यंत ताब्यात घेतले नव्हते.संतप्त नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखलेभानुदास शिंदे यांच्या मृत्यूनंतर नातेवाईक संतप्त झाले होते. गावातीलच सावकारांनी पैशाच्या कारणावरून भानुदासला मारहाण करत विष पाजले. त्यामुळे संबंधितावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखले.अखेर तलवाडा ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी जिल्हा रूग्णालयात दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना तक्रार देण्यासाठी तलवाडा ठाण्यात जाण्याचे सांगितले. त्यानंतर सायंकाळी प्रकरणी गुन्हा नोंद झाला.
गेवराई तालुक्यात व्याजाच्या पैशासाठी शेतकऱ्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:03 AM
व्याजाने दिलेल्या पैशाच्या कारणावरुन एका शेतकºयास मारहाण करीत दारूमधून विषारी द्रव पाजून त्याचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे सोमवारी घडली. या प्रकरणी मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरून तलवाडा ठाण्यात मंगळवारी ६ जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला.
ठळक मुद्देतलवाड्यात खळबळ : सहाजणांविरोधात गुन्हा