लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : कारखान्यांनी शेतक-यांचे थकलेले पैसे तात्काळ द्यावेत, यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.सन २०१६-१७ या गळीत हंगामात तेलगाव येथील सुंदरराव सोळंके कारखान्याने व सावरगाव येथील छत्रपती कारखान्याने जयमहेश कारखान्यापेक्षा ६०० रुपयांनी कमी भाव शेतकºयांना दिला. त्यामुळे त्यांनी ६०० रु पयांप्रमाणे शेतकºयांना आधी पैसे अदा करावेत तसेच यावर्षी देखील दोन्ही काररखान्यांनी शेतकºयांना एफआरपी पेक्षा वाढवून भाव देण्याचे आश्वासन देऊन पुन्हा तोंडफिरवणी केली. त्यामुळे या दोन्ही कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे अगोदर द्यावेत, आगामी गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याशिवाय गेटकेन ऊस आणू नये, यावर्षी पावसाने दडी मारल्याने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, शेतकºयांना सरसकट कर्ज माफी द्यावी, लवादाचा करार तीन वर्षांचा करण्यात यावा, इंधन दरवाढ रद्द करण्यात यावी, पीक विमा व बोंडआळीचे पैसे शेतकºयांना त्वरीत द्यावेत, या व इतर मागण्यांसाठी येथील परभणी चौकातून बैलगाडी मोर्चा काढला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे मोर्चा तहसीलवर धडकला. त्यानंतर तहसीलदार एन.जी.झंपलवाड यांना निवेदन दिले. शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झालेपेट्रोल दरवाढीचा निषेधया मोर्चात सामील झालेल्या बैलगाड्या पेट्रोल पंपावर नेण्यात आल्या. या ठिकाणी बैलगाड्यांमध्ये पेट्रोल भरून शासनाच्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी शासनविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
माजलगावात शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:38 AM