शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची होतेय फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:00 PM

भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. तसेच शेतक-यांना दिलेले आश्वासन पूर्ण न करता त्यांची फसवणूक करण्याचे कामं सुरु आहे, अशी टीका बीडच्या खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारवर केली,

ठळक मुद्देमहिलांवरील अत्याचार : प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन

बीड : भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. तसेच शेतक-यांना दिलेले आश्वासन पूर्ण न करता त्यांची फसवणूक करण्याचे कामं सुरु आहे, अशी टीका बीडच्या खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारवर केली, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.राज्य सरकार स्थापन करीत असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकºयांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टी बाधित शेतकºयांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. तसेच सरसकट कर्जमाफी करू सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाºया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही.महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी योजना ही शेतकºयांची सरसकट फसवणूक करणारी असून, नागरिक व शेतकरी राज्य शासनाच्या विरुद्ध पुढील काळात रस्त्यावर उतरेल असे देखील खा. मुंडे हे यावेळी बोलताना म्हणाल्या. दरम्यान भाजपच्या वतीने मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, जि.प.सदस्य अशोक लोढा, भारत काळे, जयश्री मस्के, राणा डोईफोडे, मा.आ. आदिनाथ नवले, अ‍ॅड.सर्जेराव तांदळे, भगीरथ बियाणी, विजयकुमार पालसिंगणकर, जगदीश गुरखुदे, रमेश पोकळे, स्वप्नील गलधर, विक्रांत हजारी, संदीप उबाळे, अ‍ॅड. संगीता धसे, उल्हास संचेती, गणेश पुजारी, रामा बांड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.निवेदनाद्वारे मागण्याप्रत्येक कर्जदार शेतकºयाला कर्जमुक्त करण्यासाठी सरसकट कर्जमाफीची योजना अमलात आणावी, अवकाळी ग्रस्तांना हेक्टरी २५ हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, महिलांवरील वाढलेले अत्याचार थांबवण्यासाठी कडक उपाययोजना करून महिलांना सुरक्षिततेची हमी द्यावी, महिला अत्याचारा विरोधातील न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी, बीड जिल्ह्यात चालू हंगामात एकाही विमा कंपनीने सरकार सोबत करार केला नाही त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहिला आहे, रब्बी पिकाच्या नुकसानीची मदत शासनाने तात्काळ द्यावी, जिल्ह्यातील गुंडगिरी मुली, महिलांवरील अत्याचार यात वाढ झाली आहे गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे व्यापारी महिला व सर्वसामान्य जनतेला त्रास सुरू झाला आहे पोलीस प्रशासनामार्फत गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :BeedबीडBJPभाजपाPritam Mundeप्रीतम मुंडेagitationआंदोलन