आष्टी : तालुक्यातील पाटण सांगवी येथील नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह बंद केल्याने २५ एकर क्षेत्रावरील पिकांमध्ये पाणी शिरून पिकांचे नुकसान होणार आहे. तरी हा ओढा तत्काळ पूर्ववत करावा. तसेच ओढा बंद करणा-यांविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी दोन दिवसांपासून आष्टी तहसील कार्यालयासमोर शेतक-यांचे आमरण उपोषण सुरू आहे.
तालुक्यातील सांगवी पाटण येथील सर्वे नं. ११८ मधील नैसर्गिक ओढा बुजविला आहे. तहसीलदारांच्या आदेशाचा अवमान करून सुधीर भगत, आसाराम भगत, शशिकांत भोसले, लक्ष्मण भगत, शंकर भगत यांनी ओढ्याचे नुकसान केले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा. ओढा पूर्ववत करावा. अन्यथा जनावरे व मुलाबाळांसह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलनकर्त्या शेतक-यांनी घेतला आहे.
या उपोषणास प्रल्हाद वनवे, संजय वनवे, बाळू वनवे, अनिल वनवे, महादेव वनवे, सुरेश वनवे, अर्जुन वनवे, ज्ञानदेव भोसले, चंद्रकांत वनवे, राजेंद्र भोसले, महेश भगत, अर्जुन भगत, गीता वनवे, स्वाती वनवे, विमल वनवे, सुनीता वनवे, मयूरी भगत, अनिता भोसले आदी शेतकरी बसले आहेत.
180821\img_20210818_131443_14.jpg
आष्टी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेले पाटण सांगवी येथील शेतकरी.