बीड : अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील संपादित शेत जमिनीच्या २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मावेजा व अतिरिक्त जमीन संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मावेजा मिळावा, या मागणीसाठी बीड जिल्हा भूसंपादन मावेजा कृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी निजामकालीन कायद्यानुसार जमिनी संपादित केल्या आहेत. या सर्व जमिनीचे पुनर्मूल्यांकन करुन २०१३ च्या सुधारित कायद्यानुसार मावेजा द्यावा, बाजारभावाच्या ६ पट रक्कम द्यावी, कुटुंबातील एका व्यक्तीस रेल्वे विभागात नोकरी द्यावी, अशी मागणी वेळोवेळी केली आहे.प्रशासनाने दखल न घेतल्याने हे आंदोलन करावे लागत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. कृती समितीचे अध्यक्ष विनायक शेळके यांच्या नेतृत्वाखाली शामसुंदर इंदाणी, गणपत मोरे, एकनाथ ढोरे, लहानू सावंत, सुधीर सुपेकर, मोतीराम डरपे, भोपू राठोर, राजेंद्र घोरड यांच्यासह शेतकरी बेमुदत उपोषण करीत आहेत.
रेल्वे भूसंपादन प्रकरणी शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:17 AM