बीड : २०१७-१८ वर्षी खरेदी नाफेड मार्फत केलेल्या तुरीचे पैसे अद्यापही मिळालेली नाहीत. हे पैसे तात्काळ द्यावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले आहे. वेळीच मागणी मान्य न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.नाफेडने शेतकºयांची तूर खरेदी केली होती. तुर खरेदी करताच पुढील सात दिवसांत त्याचे पैसे शेतकºयांना देणे बंधनकारक आहे. मात्र, २०१७-१८ साली खरेदी केलेल्या तुरीचे अद्यापही पैसे मिळालेले नाहीत.वारंवार नाफेड व जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही अद्याप पैसे न मिळाल्याने आक्रमक शेतकºयांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. आंदोलनात विष्णू चव्हाण, संजय राठोड, प्रकाश राठोड, विष्णू राठोड, आलू राठोड, उत्रेश्वर वरपे, अभिमान वरपे, आत्माराम इंगोले, सुदामती वरपे, गोपिनाथ शेळके, गयाबाई शेळके, कचरू काजळे, जालींदर नवले यांच्यासह परिसरातील शेतकºयांचा सहभाग होता.
तुरीच्या पैशासाठी शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:01 AM