शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

शेतकऱ्याने केला सोशल मिडीयाचा कल्पक वापर; बांधावरच्या फळविक्रीतून मिळवले लाखोचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 7:48 PM

जवळपास एक लाख २० हजार रुपयाचा खर्च वजा जाता चार लाख ८० हजार रुपयाचा निव्वळ नफा राहिला. 

ठळक मुद्दे अडीच एकरात केली होती खरबूजाची लागवडअंतर राखण्यासाठी बांबू लाऊन केली खरबूजाची विक्री 

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दिड महिन्यापासून सर्वकाही ठप्प आहे. उद्योगधंदे, व्यापार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालालाही ग्राहक मिळत नाहीत. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असतना फुले पिंपळगावच्या शेतकऱ्याने मात्र अशा परस्थितीतही लाखोची कमाई केली. अडीच एकरात लावलेल्या खरबूजाची त्या शेतकऱ्याने थेट बांधावरून ग्राहकाला विक्री करत तब्बल ६  लाख रुपयाचे उत्पन्न घेतल्याने इतर शेतकऱ्यांसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

माजलगाव शहरापासून केवळ ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या फुले पिंपळगाव येथील शेतकरी अविनाश कोरडे याने त्याच्या शेतातील अडीच एकरात खरबूजाची लागवड केली होती. अविनाश कोरडे याने पहिल्यांदाज जानेवारी महिन्यात खरबूजाची लागवड करून पारंपारिक पिकला फाटा देत आधुनिक शेतीचा प्रयोग केला होता. लागवड केलेल्या खरबुजाला ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले होते, तसेच गावरान खतासह वेळोवेळी रासायनिक औषधांच्या फवारण्या केल्याने चांगले पिक आले होते. हे सर्व खरबूज मार्च महिण्यात तोडणीला आले असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. 

लॉकडाऊनच्या परस्थितीत खरबुजाच्या खरेदीसाठी व्यापारी धजावत नव्हते, ग्राहकही खरेदीसाठी येत नसल्याने कोरडे हतबल झाले. त्यानंतर त्यांना कल्पना सुचली अन सोशल मिडीयाचा कल्पकतेने वापर करत त्यावर खरबूज विक्रीसाठी जाहिरात केली. फुले पिंपळगाव हे शहराच्या जवळच असल्याने अनेक ग्राहकांनी खरबूज खरेदीसाठी रीघ लागली. कोणताही वाहतुकीचा खर्च, दलाली, व्यापाऱ्यांचे कमिशनसाठी पैसे न देता थेट बांधावर बसून कोरडे यांनी केवळ २० रुपये किलो या दराने खरबूजाची विक्री केली. दररोज दिड ते दोन टन फळाची विक्री होत असल्याने त्यांनी एक महिण्यात अडीच एकरातील जवळपास सर्वच खरबूजाची विक्री करून कोरोनातही चक्क सहा लाख रुपयाचे उपन्न घेतले. यासाठी त्यांना जवळपास एक लाख २० हजार रुपयाचा खर्च वजा जाता चार लाख ८० हजार रुपयाचा निव्वळ नफा राहिला. 

अंतर राखण्यासाठी बांबू लाऊन केली खरबूजाची विक्री सद्य स्थतीत कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने शारीरिक अंतर राखण्यासाठी अविनाश कोरडे यांनी शेतात बांबू लावले होते. यामुळे ग्राहकांमध्ये ठरावीक अंतर ठेऊन संपूर्ण फळ विक्री करण्यात आली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीBeedबीड