बीड : अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळआंबा येथील कृषी विज्ञान केंद्र, येथे रेडियो किसान दिनानिमित्त शुक्रवारी शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. उपस्थित शेतकºयांना विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.यावेळी आ. संगीता ठोंबरे, आत्माचे प्रकल्प संचालक बी.एम. गायकवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी. डी. पाटील, आकाशवाणी केंद्रप्रमुख अनिल देशमुख, पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणीचे प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठचे अरुण गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.आ. ठोंबरे यांनी सरकारमार्फत राबविल्या जाणाºया विविध योजनांच्या माध्यमातून शेतकºयांनी नवीन तंत्रज्ञान, नवीन माहिती, आधुनिक शेती पद्धती, पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. आकाशवाणी बीड, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा तथा आत्मा बीड आणि दीनदयाल शोध संस्था, कृषी विज्ञान केंद्र डिघोळआंबा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बी. एम. गायकवाड यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये फळबाग वाचविण्यासाठीच्या लागणाºया तंत्रज्ञानाविषयी तसेच डॉ. नितीन मार्कंडेय यांनी चारा नियोजनाविषयी माहिती दिली. तसेच अरुण गुट्टे यांनी पीक व्यवस्थापनाविषयी उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन केले.प्रास्ताविक जयंतकुमार शेटे तर आभार प्रमोद रेणापूरकर यांनी मानले. या कार्यक्रमास सुहास पके, नरेंद्र जोशी, राजेसाहेब हारे, जयंतराव इटकुरकर, डॉ. सौरभ शर्मा यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
डिघोळअंबा येथे शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:33 AM
अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळआंबा येथील कृषी विज्ञान केंद्र, येथे रेडियो किसान दिनानिमित्त शुक्रवारी शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. उपस्थित शेतकºयांना विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
ठळक मुद्देरेडिओ किसान दिन : कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांना विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन