काकासाहेब विठ्ठल गवते (४२,रा. बेलुरा) असे मयताचे नाव आहे. त्यांचे बेलुरा शिवारात शेत आहे. मात्र, शेतीच्या मालकी हक्कावरुन त्यांचा गावातील दादा लाटे यांच्या कुटुंबाशी वाद सुरु होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट बनले होते. जमीन काकासाहेब गवते वहिती करत होते. दोन दिवसांपूर्वी न्यायालयाचा निकाल गवते यांच्या विरोधात गेला. गवते यांना शेती वहिती करण्यास मनाई हुकूम आल्यावर लाटे कुटुंबीयांनी काकासाहेब यांना दमदाटी केली. आमच्या नादी लागला तर तुझ्या मुलांचे शिक्षण होऊ देणार नाहीत, असे धमकावले. या धमक्यांना कंटाळून काकासाहेब यांनी १४ रोजी दुपारी दीड वाजता शेतात जाऊन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. बीड ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह नातेवाईकांकडे दिला. याप्रकरणी मयत काकासाहेब यांचा मुलगा ऋषीकेश गवते याच्या तक्रारीवरुन दादा लाटे, प्रेमा लाटे, कृष्णा लाटे व गंगाधर लाटे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी फरार आहेत. पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवन राजपूत तपास करत आहेत.
150921\15bed_29_15092021_14.jpg
काकासाहेब गवते