लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : कोरोनासोबत लढा देताना शारीरिक आरोग्य अबाधित राहावे. यासाठी नागरिक इम्युनिटी वाढवणारे अन्नपदार्थ घेण्यावर भर देत आहेत. यातून भाजीपाल्याला सर्वाधिक पसंती आहे. शेतकरीही विविध भाज्यांची लागवड करीत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून माणसाची जीवनपद्धती बदलत चालली आहे. सध्या आहारातून रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवता येईल, याला प्राधान्य दिले जात आहे. जीवनसत्व वाढविणारी फळे व भाजीपाला याला महत्व प्राप्त झाले आहे. नागरिकांची ही मागणी पाहून शेतकऱ्यांनी आपला मोर्चा इम्युनिटी वाढवणाऱ्या भाज्या व फळे लागवडीकडे वळविला आहे. लिंबू, आद्रक, पुदिना, हळद या अपारंपरिक पिकासह पारंपरिक भाजीपाला पिकांना पसंती दिली जात आहे. ६० ते ९० दिवसात येणारा हा भाजीपाला शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या तर नागरिकांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करणार आहे.
.....
शारीरिक क्षमता वाढविणाऱ्या भाजीपाल्याला मोठी मागणी वाढली आहे. युवक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून सेंद्रिय भाजीपाला व फळ लागवड सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन घेतो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सेंद्रिय व इम्युनिटी वाढवणाऱ्या भाजीपाल्याला मागणी वाढली आहे.
- गणेश रुद्राक्ष, प्रगतशील शेतकरी, मांडवा.
===Photopath===
140521\img-20210507-wa0168_14.jpg