लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : गेल्या पाच वर्षांपासून शेतकरी नापिकीच्या चक्रव्यूहात अडकला आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ अशा संकटाचा सामना करणाऱ्या शेतक-यांना करावा लागत आहे. जातेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने कर्जमाफी झालेल्या शेतक-यांना नवीन पीक कर्जासाठी शेतक-यांना त्रास देत पीक कर्ज देण्यास टाळाटाळ चालली आहे. याविरोधात जातेगाव येथे गुरूवारी या बँकेच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे.यासंदर्भात यापूर्वी विशाल पांढरे, गणेश भिकारी, अॅड. कल्याण चव्हाण, दत्ता वाघमारे, गणेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वारंवार निवेदन, स्मरणपत्रे देवून जाचक अट शिथील करण्याची मागणी केली होती, परंतु कोणतीही दखल घेण्यात न आल्याने गुरुवारपासून येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर उपोषण करून अट शिथील करण्याची मागणी केली. शेकडो शेतकºयांची या निदर्शनावेळी उपस्थिती होती. यावेळी आंदोलकांनी तहसीलदार व शाखा व्यवस्थापकांना निवेदन देवून या प्रश्नाची त्वरित दखल घेऊन कर्ज द्यावे, अशी मागणी केली.
पीक कर्जासाठी बँकेसमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:26 AM