बीड : ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या परिवर्तन अर्बन मल्टीस्टेट को.आॅप.सोसायटी माजलगावच्या संचालक, अध्यक्ष, सचिव तसेच शाखा व्यावस्थापकांना अटक करुन रक्कम मिळावी तसेच इतर मागण्यांसाठी ठेवीदारांनी मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले.सदर मल्टीस्टेटच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालक, शाखा व्यवस्थापकांविरुद्ध विविध नऊ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होवून २२ महिन्यांचा कालावधी उलटला. अद्याप अध्यक्ष संचालक, व शाखाधिकारी यांना संबंधित पोलीसांनी अटक केली नाही. या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करून ठेवीदारांना ठेवी परत द्याव्यात. या संस्थेचे फोरेन्सिक आॅडीट करणे.तसेच प्रशासकीय नियुक्ती करून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यात याव्या अशा विविध मागण्यांचे निवेदन ठेवीदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ठेवीदार मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
परिवर्तनच्या ठेवीदारांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 12:15 AM