गोदावरी नदीपात्रातून डिग्रस, पोहनेर, तेलसमुख, बोरखेड या गावातून सर्रासपणे गेल्या दोन महिन्यांपासून वाळूमाफियांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून अवैधरित्या वाळू उपसा चालू केला आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. संबंधित गावच्या लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत सर्व खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून व मोबाईलद्वारे अनेकवेळा कल्पना देण्यात आली. काही लोकप्रतिनिधींनी लेखी स्वरूपात अर्ज केले. मध्यंतरी जनतेच्या रेट्यामुळे तात्पुरता वाळू उपसा स्थगित केला आहे. मात्र, दोन महिन्यांपासून अवैधरित्या वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य उत्तम माने, पंडितराव मुठाळ, विष्णू रोडगे, रमेश सहजराव हे उपोषणास बसले आहेत.
नदीपात्र खडकाळ होण्याची भीती
वाळू माफियांनी उच्छाद मांडल्याने भविष्यात गंगेचे पात्र वाळूऐवजी फक्त खडकाळ राहील, अशी अवस्था होईल. दररोज १०० ते १५० वाहने सर्रास चालू आहेत. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे अवैधरित्या उपसलेल्या वाळूचा महसूल संबंधितांकडून वसूल करून संबंधित वाळूमाफियांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
===Photopath===
150421\img-20210415-wa0338_14.jpg