बीड : बीड शहरातून काम आटोपून आपल्या गावी निघालेल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेना हल्ला केला. यामध्ये उपजिल्हाप्रमुखाचे हात-पाय तोडण्याच्या उद्देशाने फ्रॅक्चर करण्यात आले आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास बीड तालुक्यातील पिंपळनेर रोडवर बायपास रोडच्याजवळ घडली. या हल्यात पदाधिकाऱ्यासह आणखी दोघे जखमी आहेत. अद्यापही बीड ग्रामीण ठाण्यात याची नोंद झालेली नाही.
ज्ञानेश्वर खांडे (रा.म्हाळसजवळा ता.बीड) असे हल्ला झालेल्या उपजिल्हाप्रमुखाचे नाव आहे. खांडे बुधवारी सायंकाळी आपल्या दोन मित्रांसह कारमधून गावी जात होते. पिंपळनेर रोडवरील बायपासच्या खालीच त्यांची कार अडवण्यात आली. काही समजण्याच्या आतच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात लोखंडी रॉड, तलवारीचा वापर केल्याचा संशय आहे. या हल्ल्यात खांडे यांचे दोन्ही पाय व दोन्ही हात फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे. त्यांचा जबाब घेण्यासाठी बीड ग्रामीण ठाण्याचे पथकही पुण्याला गेले आहे. परंतू दुपारपर्यंत या प्रकरणाची ठाण्यात नोंद झाली नव्हती. त्यामुळे हल्लेखोर कोण? हे समोर आलेले नाही.
जिल्हाप्रमुखांची जिल्हा रूग्णालयात धावहल्ल्याची बातमी समजताच जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, अनिल जगताप यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हा रूग्णालयात धावले. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने खांडे यांना पुण्याला हलविण्यात आले.
हल्लेखाेर कोण?खांडे हे बीडचे उपजिल्हाप्रमुख आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वीच केजमध्ये बैठकीला गेल्याने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. याबाबत खांडेंनी पिंपळनेर पोलिस ठाणे गाठत हा सर्व प्रकार ठाणेदारांना सांगितला. आपल्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतू पिंपळनेर पोलिसांनी याची गांभीर्याने दखल न घेतल्यानेच हा हल्ला झाला. दरम्यान, खांडे यांच्यावर हल्ला करणारे कोण? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमाेर आहे. यात काही राजकीय लोकांचाही समावेश आहे का, याचीही तपासणी केली जाऊ शकते. हा हल्ला वैयक्तिक वादातून आहे की राजकीय द्वेषातून, हे देखील खांडे यांच्या जबाबानंतर स्पष्ट होणार आहे.
एकावर पुण्यात अधिक उपचार सुरूतिघाजणांवर हल्ला झाला आहे. एकाची प्रकृती चिंजाजनक असल्याने पुण्याला हवलवले आहे. त्यांचा जबाब घेण्यासाठी एक पथक पुण्याला गेले आहे. सध्या तरी हल्लेखोर कोण, हे समजले नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास व कारवाई केली जाईल.- शिवाजी बंटेवाड, पोलिस निरीक्षक बीड ग्रामीण